नागपूर - कोरोना रुग्णांची शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या नागपुरातून एक दिलासादायक बातमी पुढे आली आहे. आज एका रुग्णाने कोरोना विषाणूविरोधातील लढाई जिंकल्यानंतर त्याला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली आहे. डॉक्टर व नर्सने टाळ्या वाजवून त्याला निरोप दिला.
नागपुरात आणखी एकजण कोरोनामुक्त; डॉक्टर, नर्सने टाळ्या वाजवून दिला निरोप - कोरोना अपडेट नागपूर
कोरोना रुग्णांची शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या नागपुरातून एक दिलासादायक बातमी पुढे आली आहे. कोरोनाचा एक रुग्ण बरा होवून घरी परतला आहे.
हा रुग्ण शहरातील एम्प्रेस सिटी परिसरात राहतो. ते १७ मार्चला वृंदावन ( दिल्ली ) येथून तेलंगणा एक्सप्रेसने नागपुरात दाखल झाले होते. त्यांना कोरोना विषाणूचे लक्षणे आढळून आल्यावर २८ मार्चला कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये पॉझिटिव्ह आल्याने त्यांना विशेष वॉर्डात दाखल करण्यात आले. १४ दिवसांच्या उपचारानंतर त्यांची नंतर पहिली चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर 14 व 18 एप्रिलला घेण्यात आलेल्या चाचण्यासुद्धा पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरूच ठेवण्यात आले. आता 21आणि 22 एप्रिलला घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये निगेटिव्ह आढळून आल्याने आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
बुधवारी कोरोनातून बरे झालेल्या दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत एकूण कोरोनाचे १५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.