नागपूर- शहरात आणखी एका रुग्णाची कोरोना तपासणी 'पॉझिटीव्ह' आली आहे. शहरातील एकूण रुग्णांची संख्या 17 झाली आहे. हा रुग्ण दिल्ली येथून परत आलेला आहे, या रुग्णाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यात त्याचा मरकझसोबत कोणताही संबंध नसल्याचे सांगतो आहे.
नागपुरात आणखी एका रुग्णाची कोरोना टेस्ट 'पॉझिटिव्ह', संख्या 17 वर - नागपूर कोरोना अपडेट
शहरात आणखी एका रुग्णाची कोरोना तपासणी 'पॉझिटीव्ह' आली आहे. शहरातील एकूण रुग्णांची संख्या 17 झाली आहे. हा रुग्ण दिल्ली येथून परत आलेला आहे.
हा रुग्ण व्यावसायिक असून तो 13 मार्च रोजी दिल्ली येथे गेला होता. त्यानंतर तो 15 मार्च रोजी नागपूरला परत आला. या दरम्यान त्याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आज या रुग्णाचा तपासणी अहवाल रुगणालयाला प्राप्त झाला असून त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट आहे. या रुग्णाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात त्याने आपला मरकझसोबत काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. हा रुग्ण दिल्ली येथून नागपूरला परत आल्यानंतर प्रशासनाने त्याचे आधीच विलगीकरण केले होते. आता त्याला पुढील उपचारासाठी मेयो येथे दाखल करण्यात आले आहे.
सुमारे पाच दिवसानंतर शहरात नवीन रुग्ण आढळला आहे. शहरातील एकूण रुग्णांची संख्या 17 झाली आहे. तर 4 कोरोना बाधितांना उपचारनंतर सुट्टी देण्यात आली आहे, त्यामुळे आता ऐकून 13 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.