महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसह म्युकरमायकोसिसच्या प्रतिबंधासाठी जनजागृती; अधिकारी करणार गाव भेटी

कोरोना तसेच म्युकरमायकोसिस, आजाराबाबतचे जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेले व्हिडिओ सर्व प्रथम गावागावांमध्ये दाखविले जाणार आहेत. त्यानंतर अधिकारी मार्गदर्शन करणार असून दररोजचा अहवाल जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना सादर केला जाणार आहे. ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या कमी करणे, संभाव्य तिसऱ्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली आहे. उद्यापासून जिल्ह्याच्या सर्व भागात त्याचा अंमल केला जाणार आहे.

अधिकारी करणार गाव भेटी
अधिकारी करणार गाव भेटी

By

Published : May 27, 2021, 6:46 AM IST

नागपूर - म्युकर मयकोसिसचा थैमान सुरू असताना कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्याच्या अनुषंगाने नुकताच पालकमंत्री नितीन राऊत यांनी दौरा केला आहे. यात आता जिल्हाधिकारी यांनी आदेश देत आता जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना गाव भेटीसाठी सुचना दिल्या आहेत. म्युकरमायकोसिस तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी टास्क फोर्सची बैठक घेतली. यानंतर यासंदर्भातील आदेश देत गुरुवारपासून अधिकाऱ्यांना गाव भेटीवर जावे लागणार आहे. या गाव भेटीतून कोरोना लाटेच्या प्रतिबंधासाठी प्रभावीपणे उपाययोजना आणि प्रचार प्रसिद्धी करण्याचे निर्देशीत केले होते. गेल्या काही दिवसात ग्रामीण भागांमधील रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच म्युकरमायकोसिस व लहान मुलांच्या आजारांमध्ये देखील भर पडत आहे.

13 पथके देणार गावा-गावात भेट....

पावसाळा तोंडावर असून या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी प्रत्येक गावात जाऊन तेथील पायाभूत सुविधा बळकट करणे, आरोग्य यंत्रणेला गतिशील करणे, लसीकरणाला गती देणे, म्युकरमायकोसिस आजाराबाबत जनजागृती करणे, विशेषतः शेतकरी वर्गामध्ये ज्यांचा मातीशी शेतीशी संबंध येतो अशा सर्वांना या आजारापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती करणे, गरजेचे आहे. यासाठी बुधवारी दिवसभराच्या बैठकांनंतर आरोग्य विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कामठी, मौदा, उमरेड, कुही, भिवापूर, सावनेर, काटोल, कळमेश्वर, नरखेड, हिंगणा, नागपूर ग्रामीण, रामटेक, पारशिवनी अशा ठिकाणी 13 पथकांचे गठण करण्यात आले आहे.

व्हिडिओच्या माध्यमातून करणार जनजागृती...

कोरोना तसेच म्युकरमायकोसिस, आजाराबाबतचे जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेले व्हिडिओ सर्व प्रथम गावागावांमध्ये दाखविले जाणार आहेत. त्यानंतर अधिकारी मार्गदर्शन करणार असून दररोजचा अहवाल जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना सादर केला जाणार आहे. ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या कमी करणे, संभाव्य तिसऱ्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली आहे. उद्यापासून जिल्ह्याच्या सर्व भागात त्याचा अंमल केला जाणार आहे.

उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तसेच कार्यकारी अभियंता दर्जाचे अधिकारी या टीमचे प्रमुख असून त्यांच्यासोबत ग्रामपंचायत निहाय लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, कोतवाल, स्वस्त धान्य दुकानदार, स्थानिक खाजगी वैद्यकीय व्यवसायिक, शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका उपस्थित राहणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details