नागपूर - जगभरात दहशत माजवलेल्या कोरोना विषाणूचे रुग्ण महाराष्ट्रात देखील सापडले आहे. नागपूर विभागात कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण नाही. मात्र, संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या कोरोनाच्या ३ संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत नागपूर विभागात ५९ संशयित रुग्णांच्या रक्तांचे नमुने तपासले आहे. त्यापैकी ४५ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले आहे. तसेच अजून १४ जणांचे अहवाल येणे बाकी आहेत.
कोरोना : नागपुरात ४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह, ३ संशयित रुग्णालयात दाखल
दुबई ते मुंबई असा विमान प्रवास करणाऱ्या नागपुरातील ३ प्रवाशांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर आरोग्य यंत्रणा नजर ठेवून आहे. तसेच नागपूर विमानतळावर आतापर्यंत ६०४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना संशयितांसाठी ९५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पुढे ४१० खाटांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे नागपूर विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले. तसेच कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सक्षम असून सामान्य नागरिकांनी सुद्धा या अभियानाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जयस्वाल यांनी केले आहे.