नागपूर - यावर्षी उन्हाळ्यात राज्यात भारनियमन होणार नसल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे. वीज निर्मिती करता आवश्यक कोळसा आणि पाणी राज्यात उपलब्ध असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला आहे.
उकाड्यापासून दिलासा.. यंदाच्या उन्हाळ्यात राज्यात भारनियमन नाही - बावनकुळे - powercut
यावर्षी उन्हाळ्यात राज्यात भारनियमन होणार नसल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे. वीज निर्मिती करता आवश्यक कोळसा आणि पाणी राज्यात उपलब्ध असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागताच राज्यातील नागरिकांना भारनियमांची चिंता सतावते. करण उन्हाळ्यात विजेची मागणी दुपटीने वाढत असल्याने विजेचा तुटवडा निर्माण होतो. अशा परिस्थितीत शहरी आणि ग्रामीण भागात भारनियमन केले जाते. मात्र गेल्या काही वर्षात भारनियमनाचा त्रास कमी झाला असताना यावर्षी राज्यात भारनियमन होणार नसल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
आज नागपुरात आयोजित एक पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली. मार्च महिना उजाडलेला आहे आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमान वाढायला देखील सुरवात झाली आहे. उन्हाळ्याच्या एप्रिल आणि मे महिन्यात विदर्भातील तापमानाचा पारा 47 अंश सेल्सिअस पेक्षा वर जातो. अशा परिस्थितीत भारनियमनाने वैदर्भीय जनतेचे हाल होतात. मात्र ऊर्जा मंत्र्यांच्या घोषणेमुळे विदर्भातील जनतेला नक्कीच दिलासा मिळाला आहे.