नागपूर- हेवीवेट मंत्री नितीन गडकरी विरुद्ध लढणार कोण ? या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. काँग्रेसने नितीन गडकरी यांच्या विरोधात नाना पटोले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीदेखील आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याने नागपुरात तिरंगी लढत बघायला मिळणार आहे.
गडकरी विरुद्ध नाना पटोले लढणार, काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर - Nagpur
हेवीवेट मंत्री नितीन गडकरी विरुद्ध लढणार कोण ? या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. काँग्रेसने नितीन गडकरी यांच्या विरोधात नाना पटोले यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
केंद्रातील सर्वात यशस्वी मंत्री म्हणून नितीन गडकरी यांच्या नावाचा उल्लेख होतो. त्यामुळेच नितीन गडकरी विरोधात काँग्रेस कुणाला उमेदवारी देईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. काँग्रेसने आज (बुधवारी) २१ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील ५ उमेदवारांची नावे आहेत. त्यामध्ये विदर्भातील २ उमेदवारांची वर्णी लागली आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघातून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गडचिरोली येथून नामदेव उसेंडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. नाना पटोले यांचे नाव अनेक दिवसांपासून चर्चेत होते. मात्र, त्यांच्या नावावर बहुजन समाजातील अनेक संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांची उमेदवारी धोक्यात आली असल्याचे बोलले जात होते. मात्र, या सर्व शंकांना विराम देत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने जाहीर केलेल्या यादीत नाना पटोले यांच्या नावावर अंतिम मोहर उमटवली आहे.