नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लाखोंच्या समर्थकांसह अर्ज दाखल केला. यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांनी देखील आपला अर्ज सादर केला आहे. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते.
नागपुरातून नितीन गडकरींनी अर्ज केला दाखल ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन - gadkari
यावेळी गडकरींनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले असून त्यांच्या समर्थकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी नितीन गडकरी रवाना
शहरातील संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता गडकरी निघाले होते. सकाळी पत्नी कांचन गडकरींनी यांनी औक्षण केल्यानंतर ते रवाना झाले. अर्ज भरण्यापूर्वी गडकरींनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले असून गडकरी समर्थकांनी काढलेल्या भव्य मिरवणुकीमुळे वातावरण निर्मिती करण्यात भाजपला यश आले आहे. त्यांच्या समर्थकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.
Last Updated : Mar 25, 2019, 1:21 PM IST