नागपूर:जयेश पुजारा उर्फ एलियास शकिलने चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे करण्यात सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी त्याच्यावर 'यूएपीए' कायद्याचे कलम लावण्यात आले असल्याची माहिती नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. त्याचबरोबर जयेश पुजाराचे बंदी घातलेली संघटनांसोबत संबंध आहे असे निष्पन्न झाले आहे. याशिवाय त्याचे 'डी गॅंग' टोळीतील सदस्यांसोबत संबंध आहेत असा खुलासा झाला. जयेश पुजारावर गुन्हे केंद्रीय आणि राज्याच्या तपास यंत्रणाच्या समन्वयातून दाखल करण्यात आले आहेत, असे देखील त्यांनी सांगितले. कर्नाटक येथील कारागृहात आल्यानंतर त्यांची भेट काही गुंड टोळक्यांसोबत झाली होती. तेव्हा पासूनच तो कारागृहातन आपले रॅकेट चालवत होता, असा देखील खुलासा झाला आहे.
काय आहे प्रकरण?नागपुरातील खामला येथे असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी सकाळी धमकीचे सलग तीन फोन आले होते. फोन करणारी व्यक्ती जयेश कांथा उर्फ पुजारा असल्याचे पोलिसांना कळले. यावेळी आरोपीने १० कोटीची खंडणी मागितली. संबंधित फोन बंगलोर येथील एका तरुणीच्या मोबाईलवरून करण्यात आले होते. ज्या तरुणीच्या मोबाईलवरून फोन आल्याचे उघड झाले आहे, त्या तरुणीने फोन केला नसला तरी त्या तरुणीचा एक मित्र जयेश कांथा उर्फ पुजारा कारागृहात कैद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेतले असून त्या अनुषंगाने तपास सुरू झाला आहे.