महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरच्या विकासाकरीता योजना सुरू करणार, नितीन गडकरींचे प्रचारसभेत आश्वासन - vLOKSABHA

मनिष नगर येथे झालेल्या प्रचारसभेत गडरींनी ५ वर्षांचा आढावा घेतला. मेट्रो, रस्ते, पाणी, नागरी सुविधा यासाठी शक्य तितके प्रयत्न केल्याचे गडकरींनी सांगितले. तसेच, काही कामे राहून गेल्याची कबुलीही त्यांनी दिली. मात्र, येणाऱ्या काळात सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

नितीन गडकरी

By

Published : Mar 31, 2019, 10:49 AM IST

नागपूर - मी कधीही जात, धर्म, पंथाचा विचार न करता जनसेवेचे व्रत जोपासले. येणाऱ्या काळात नागपूरच्या विकासाकरीता अनेक योजना सुरू करणार आहे, असे आश्वासन नागपूर मतदारसंघातील भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघात गडकरींनी पहिली प्रचार सभा घेतली.

नितीन गडकरी यांनी नागपुरात पहिली प्रचार सभा घेतली

मनिष नगर येथे झालेल्या प्रचारसभेत गडरींनी ५ वर्षांचा आढावा घेतला. मेट्रो, रस्ते, पाणी, नागरी सुविधा यासाठी शक्य तितके प्रयत्न केल्याचे गडकरींनी सांगितले. तसेच, काही कामे राहून गेल्याची कबुलीही त्यांनी दिली. मात्र, येणाऱ्या काळात सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. दिलेला शब्द पूर्ण करणे माझा स्वभाव आहे, असे गडकरी म्हणाले.

नऊ हजार नागरिकांची ह्रदयाची शस्त्रक्रिया केली. ६० हजार लोकांना चष्मा वाटप केले. २५ हजार लोकांची डोळ्यांची कॅटरॅक्ट शस्त्रक्रिया केली. तसेच, स्तन कर्करोग आणि अपंगांना कृत्रिम मोबाईल लावून देण्याची कामेही केली, असे सांगून गडकरींनी आपल्या कामांचा पाढा वाचला. नितीन गडकरींविरोधात आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांचे कडवे आव्हान आहे. त्यामुळे ही लढत संघर्षपूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details