महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nitin Gadkari Extortion Case : नितीन गडकरी खंडणी प्रकरण; आरोपी जयेश पुजारीनं गिळली तार, रुग्णालयात दाखल - नितीन गडकरी

Nitin Gadkari Extortion Case : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी आणि खंडणी प्रकरणातील आरोपी जयेश पुजारी यानं कारागृहात लोखंडी तार गिळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. तार गिळल्यामुळे जयेश पुजारीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Nitin Gadkari Extortion Case
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 8:30 AM IST

Updated : Oct 7, 2023, 9:17 AM IST

नागपूर Nitin Gadkari Extortion Case : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणातील आरोपी जयेश पुजारी यानं नागपूर कारागृहात लोखंडी तार गिळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. तार गिळल्यानं त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. जयेश पुजारीनं ( Nitin Gadkari Threat Case ) खरोखर आत्महत्येचा प्रयत्न केला, की दुसऱ्या कारागृहात जाण्यासाठी ड्रामा केला याचा तपास पोलीस घेत आहेत.

जयेशला नागपूर कारागृहात राहायचे नाही. त्यामुळे त्यानं बारीक जाळीचे दोन तार गिळले. त्याची सोनोग्राफी केल्यानंतर त्याच्या जीवाला काहीही धोका नासल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिल्यानंतर जयेशला पुन्हा कारागृहात हलवण्यात आलं आहे. त्यानं गिळलेल्या तारा फारच लहान आहेत, त्या नैसर्गिक मार्गानं बाहेर पडतील, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. - वैभव आगे, अधीक्षक, नागपूर कारागृह

जयेश पुजारीनं कारागृहात गिळली तार :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणातील जयेश पुजारी हा आरोपी आहे. जयेश पुजारीनं नागपूर कारागृहात असताना लोखंडी तार गिळल्याचं स्पष्ट झाल्यानं त्याला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. जयेश पुजारीनं जाळीचे दोन तार गिळले होते.

बेळगाव कारागृहात हलवण्यासाठी जयेश पुजारीची याचिका :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या धमकी आणि खंडणी प्रकरणात जयेश पुजारी हा मास्टर माईंड आहे. नागपूर शहर पोलिसांनी कर्नाटकातील बेळगाव कारागृहातून जयेश पुजारीला अटक केली होती. जयेश कांथा उर्फ पुजारी हा सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याच्याविरुद्ध कर्नाटकात दोन फौजदारी खटले प्रलंबित आहेत. त्या आधारावर मला बेळगाव इथं स्थानांतरित करण्यात यावं, अशी मागणी त्यानं एका याचिकेच्या मार्फत न्यायालयात केली आहे.

काय आहे प्रकरण :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील खामला इथच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन आले होते. जयेश कांथा उर्फ पुजारी नावानं धमकीचे फोन कॉल आल्याचं उघड झालं होतं. या वेळी आरोपीनं 10 कोटीची खंडणी मागितली. बंगळुरू इथल्या एका तरुणीच्या मोबाईलवरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन कॉल करण्यात आले होते. ज्या तरुणीच्या मोबाईलवरून फोन आल्याचं उघड झालं होतं. हे धमकीचे फोन त्या तरूणीनं केला नसला, तरी त्या तरुणीचा मित्र असलेल्या जयेश कांथा उर्फ पुजारीनं केल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेतलं असून त्या अनुषंगानं तपास सुरू आहे.

'पीएफआय'च्या संपर्कात होता जयेश :जयेश पुजारी उर्फ शाकीरचे संबंध दहशतवादी संघटनांसोबत असल्यानं नागपूर पोलिसांनी त्याच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तो पीएफआय नॅशनल एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलचा सचिव मोहम्मद अफसर पाशाच्या संपर्कात आला होता. त्यानंतर आणखी एका कट्टरवादी पदाधिकऱ्यांच्या तो संपर्कात होता, अशी माहिती तपासात पुढं आली असून त्यांनी जयेशचा ब्रेन वॉश केल्याचं पुढं आलं आहे.

हेही वाचा :

  1. Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरी धमकी प्रकरणी नागपूरच्या विशेष न्यायालयाने एनआयएचा अर्ज फेटाळला
  2. Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरी धमकी प्रकरण; खटला मुंबईला स्थलांतरित करण्यासाठी एनआयएची उच्च न्यायालयात धाव
Last Updated : Oct 7, 2023, 9:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details