नागपूर - कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बी. एस. येडियुरप्पा लाच प्रकरणातील काँग्रेसचे आरोप हास्यास्पद आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
नागपूर- येडीयुरप्पा डायरी प्रकरण हास्यास्पद- नितीन गडकरी - रणदीप सुरजेवाला
कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बी. एस. येडियुरप्पा लाच प्रकरणातील काँग्रेसचे आरोप हास्यास्पद आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
येडियुरप्पा यांच्या डायरीचा आधार घेत काँग्रेसने कर्नाटकमध्ये येडियुरप्पा सत्तेवर असताना भाजप नेत्यांना कोट्यवधींची लाच देण्यात आली, असा आरोप केला. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी एका डायरीचा आधार घेत अठराशे कोटींचा व्यवहार झाल्याचा दावाही केला. त्यानंतर आज गडकरी यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, डायरीचे प्रकरण खोटे असून या प्रकरणाची चौकशी याआधीच आयकर विभागाने केलेली आहे. डायरीच्या खाली नमूद येडियुरप्पांची सही खोटी असून ती झेरॉक्स करून वापरण्यात आली आहे. तसेच हे सर्व आरोप खोटे असून ते हास्यास्पद आणि मूर्खतापूर्ण असल्याचे ते म्हणाले.