नागपूर- जिल्ह्यात आणखी नऊ लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे, नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 72 वर पोहोचली आहे. सर्व नऊ कोरोनाबधितांना आधीच आमदार निवासात क्वारंटाईन करण्यात आले होते.
नागपुरात आणखी नऊ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह, एकूण बाधितांचा आकडा 72
सतरंजीपुरा येथील एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या अनेकांना प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे. त्या लोकांचे स्वॅब तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्यापैकी नऊ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे त्या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 12 कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर एकाचा मृत्यू झालेला आहे. सध्या नागपुरात 59 रुग्णांवर मेयो आणि मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहे.