नागपूर - राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात बुधवारी ४१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा मंदावलेला वेग पुन्हा वाढतोय की काय अशी शंका येऊ लागली आहे. शहरातील रुग्णांमध्ये ४१ कोरोना बाधितांची भर पडल्याने आतापर्यंत रुग्णांची एकूण संख्या १ हजार ३६७ इतका झाली आहे.
नागपुरमध्ये ४१ कोरोनाबाधित रुग्णांची भर; २५ रुग्णांना डिस्चार्ज - नागपूर कोरोना रुग्ण संख्या
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये ८२ रुग्ण नागपुरच्या ग्रामीण भागातील आहेत. याशिवाय नागपूरात २१ कोरोनाबाधितत रुग्णांची नोंद आहे. त्यापैकी २ रुग्ण नागपूर ग्रामीणचे आहेत तर ८ रुग्ण हे दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत.
बुधवारी वाढलेले रुग्ण संशयित असल्याने त्यांना आधीच प्रशासनाने क्वारंटाईन केले होते. तसेच २५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९७२ वर पोहचली आहे. त्यामुळे डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांचा आकडा हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये ८२ रुग्ण नागपुरच्या ग्रामीण भागातील आहेत. याशिवाय नागपूरात २१ कोरोनाबाधितत रुग्णांची नोंद आहे. त्यापैकी २ रुग्ण नागपूर ग्रामीणचे आहेत तर ८ रुग्ण हे दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत. सध्या नागपुरच्या मेयो, मेडिकल, एम्स आणि मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.