नागपूर - दिवसभरात नागपूर शहरात ७१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ हजार ८६५ इतकी झाली आहे. पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने त्यांना प्रशासनाने आधीच इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन केले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ज्यात त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आज २५ कोरोना रुग्ण उपचारानंतर अगदी ठणठणीत बरे होऊन घरी देखील परतले आहेत.
नागपूरमध्ये आढळले ७१ नवीन कोरोनाबाधित - nagpur corona cases
नागपुरात कोविडचे लक्षण नसलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांना आमदार निवास येथे तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला ठेवण्यात आले आहे. सध्या नागपुरात ४४३ अॅक्टिव्ह रुग्णांवर मेयो, मेडिकल, एम्स आणि मिलिटरी हॉस्पिटल कामठी येथे उपचार सुरू आहेत.
नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ हजार ३९६ इतकी झाली आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी २०१ रुग्ण नागपूर ग्रामीणचे असून, त्यापैकी १४७ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच ५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय आज पुन्हा एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत नागपुरात एकूण २७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे २७ पैकी १० मृत्यू हे नागपूर जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे आहेत.
नागपुरात कोविडचे लक्षण नसलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांना आमदार निवास येथे तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला ठेवण्यात आले आहे. सध्या नागपुरात ४४३ अॅक्टिव्ह रुग्णांवर मेयो, मेडिकल, एम्स आणि मिलिटरी हॉस्पिटल कामठी येथे उपचार सुरू आहेत. नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७४ टक्के इतके आहे. तर मृत्यू दर हा १.४४ इतका आहे.