नागपूर -जिल्ह्यात नव्या 122 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 हजार 293 वर पोहचली आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वाना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच आणखी 3 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात सध्या 1 हजार 132 सक्रिय रुग्ण आहेत.
जिल्ह्यात नव्या 122 कोरोना रुग्णांची नोंद ; तर तिघांचा मृत्यू
जिल्ह्यात नव्या 122 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 हजार 293 वर पोहचली आहे.
दरम्यान 132 कोरोना रुग्ण उपचारानंतर अगदी ठणठणीत बरे होऊन घरी देखील परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 हजार 113 वर पोहचली आहे. या शिवाय 3 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचं म्हणजे, 61 पैकी 44 मृत्यू हे नागपुर जिल्ह्यातील आहेत. तर 17 मृत्यू हे नागपूर जिल्ह्या बाहेरील रुग्णांचे आहेत. यामध्ये अमरावती आणि अकोला येथील नागरिकांचा कोरोनामुळे नागपुरात मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.
सध्या नागपुरातील 7 ठिकाणी 1 हजार 132 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (मेयो) 255 तर शासकीय वैद्यकीय रुग्णांलयात (मेडीकल) 276 , एम्समध्ये 50, कामठी येथील मिलीटरी हॉस्पिटलमध्ये 18 आणि खासगी रुग्णालयात 32 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मध्यवर्ती कारागृहात तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये 60 आणि आमदार निवासामध्ये 341 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपूरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 64.16 टक्के इतके आहे. तर मृत्यू दर हा 1. 92 ऐवढा आहे.