नागपूर -सरकार तिला सर्वोतपरी मदत करत आहे. डॉक्टरांचे देखील शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही देखील मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांशी बोललो आहोत. कुठल्याही परिस्थितीत ही मुलगी बरी झाली पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण म्हणाल्या. आज त्यांनी रुग्णालयात जाऊन पीडितेची भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.
तिची भेट घेतल्यानंतर त्या वर्ध्यालाही जाणार आहेत. त्याठिकाणी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
राज्या महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी देखील पीडितेची भेट घेतली. त्या म्हणाल्या, मी स्वतः डॉक्टर आहे. त्यामुळे तिला बघितल्यानंतर मला जाणवले की, ती मुलगी जगण्यासाठी संघर्ष करत आहे. तिचे मूत्रपिंड, फुप्फुस, रक्तदाब सर्व काही व्यवस्थित आहे. तसेच तिचे शरीरही प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंगणघाट जळीतकांडाचे ईटीव्ही भारतने प्रकाशित केलेले वृत्त -
धक्कादायक..! हिंगणघाटमध्ये तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
वर्धेतील 'त्या' पीडितेवर नागपुरात उपचार सुरू
वाचवा...वाचवा...आवाज आला अन्... तिच्यावर पेट्रोल ओतून 'टेंभा' फेकला
हिंगणघाट जळीत प्रकरण- पुढील ७२ तास महत्त्वाचे, दृष्टीसह वाचाही जाण्याची शक्यता