नागपूर- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोटलडोह धरणासह इतरही धरणांच्या पाण्याची पातळी मृतसाठ्यापर्यंत गेल्याने नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय समितीने शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याविरोधात राष्ट्रवादीने मडके फोडो आंदोलन करण्यात आले.
नागपूर महापालिकेत राष्ट्रवादीचे मडके फोडो आंदोलन - news
नागपूर शहराला एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्याच्या निर्णय महापालिकेने घेतला आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज मडके फोडो आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमदार प्रकाश गजभिये आणि शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. शहरावर ओढवलेल्या पाणी संकटासाठी महापालिकेतील सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप प्रकाश गजभिये यांनी केला आहे. आज शहराची लोकसंख्या ४० लाखांच्या आसपास असताना महापालिकेचे सत्ताधारी त्यादृष्टीने विचार करत नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. मडके फोडो आंदोलनानंतर आंदोलकांनी थेट महापौरांचे कार्यालय गाठून त्यांना पाणीसंकटाबाबत जाब विचारला.