नागपूर - नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नाना पटोले यांचे नागपूर रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत झाले. ते आज (शुक्रवार) दिल्लीवरून राजधानी एक्सप्रेसने नागपूरला आले. त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांचे नागपुरात जंगी स्वागत - loksabha
पटोले यांच्यासोबत गडचिरोलीतील उमेदवार नामदेव उसेंडी हे देखील होते. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे पटोले यांनी नागपुरातून विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला.
नागपूर
पटोले यांच्यासोबत गडचिरोलीतील उमेदवार नामदेव उसेंडी हे देखील होते. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे पटोले यांनी नागपुरातून विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला. नाना पटोले हे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात उभारले आहेत. गडकरी यांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करत नानांनी गडकरींचे आभार मानले.