नागपूर - विदर्भ सध्या उन्हाने तापला आहे. संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा हा ४५ अंशावर पोहचला आहे. सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे नागपूर शहरात कर्फ्यु लागल्यासारखे दृश्य पहावयास मिळत आहे. हवामान खात्याने नागपूर शहराला ३० एप्रिल व १ मे हे दोन दिवस रेड अलर्ट म्हणून घोषित केले. त्यामुळे शहरात तापमानात वाढ पहावयास मिळत आहे.
नागपुरात २ दिवस हवामान खात्याकडून रेड अलर्ट - red alert
वाढत्या तापमानामुळे नागपूर शहरात कर्फ्यु लागल्यासारखे दृश्य पहावयास मिळत आहे. हवामान खात्याने नागपूर शहराला ३० एप्रिल व १ मे हे दोन दिवस रेड अलर्ट म्हणून घोषित केले.
वाढत्या तापमानामुळे नागपूर शहरात कर्फ्यु लागल्यासारखे दृश्य पहावयास मिळत आहे. हवामान खात्याने नागपूर शहराला ३० एप्रिल व १ मे हे दोन दिवस रेड अलर्ट म्हणून घोषित केले.
त्यामुळे हवामान खात्याने विदर्भात उन्हाळ्याची तीव्रता अधिक असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये तापमान हे ४५ अंशाच्या वर असल्याने नागरिकांनी गर्मी व उन्हामुळे होणाऱ्या रोगांपासून बचाव करण्यासाठी काम असेल तरच घराच्या बाहेर पडण्याचा सल्ला ही देण्यात येत आहे. हवामान खात्याने देखील रेड अलर्टचा इशारा प्रादेशिक हवामान खात्याचे उपनिर्देशक एम.एल शाहू यांनी दिला आहे.