नागपूर- जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक भाजप विरुद्ध इतर पक्षांमध्ये होत आहे. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपुरातील जिल्हा परिषदेची निवडणूक असल्याने भाजप जिल्हा परिषदेत पुन्हा सत्तेत येण्यासाठी अधिक जोर लावताना दिसत आहे.
Live Updates -
- 11.36 AM - कॅबीनेट मंत्री सुनील केदार यांनी बजावला मतदानाचा हक्क
हेही वाचा - 'शरद पवारांनी विचारपूर्वक माझ्यावर गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली'
नागपूर जिल्हा परिषदेच्या 58 आणि पंचायत समितीच्या 116 जागांसाठी 7 जानेवारीला जिल्ह्य़ात मतदान होत आहे. जिल्हा परिषद आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने चांगलीच मोर्चेबांधणी केली आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेना वेगळी लढत आहे. तर भाजपही 'एकला चलो'च्या भूमिकेत स्वतंत्र लढत आहे.
- भाजप - 21
- काँग्रेस - 19
- शिवसेना - 8
- राष्ट्रवादी काँग्रेस - 7
- बीएसपी -3
नागपूर जिल्ह्यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 12 पैकी 11 जागा मिळाल्या होत्या. तर फक्त 1 जागा काँग्रेसकडे होती. मात्र, 2019 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी 5 जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे. तर नागपूर जिल्हा परिषदमध्ये आपले अस्तित्व टिकवण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी-काँग्रेसने कंबर कसली आहे. मात्र, मतदारराजा नेमका कोणाला कौल देतो, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.
हेही वाचा - नागपूर जिल्हा परिषद निवडणूक अनिल देशमुखसह देवेंद्र फडणवीसांसाठी प्रतिष्ठेची, उद्या मतदान