नागपूर -खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती ( Thermal Power Generation Station ) केंद्राची राख कन्हान नदीत ( Kanhan River ) मिसळत असल्याचे समोर आले आहे. यामुळे नागपुरकरांवर ( Nagpurkar ) पुन्हा पिण्याच्या पाण्याचे संकट ( Water crisis ) निर्माण होण्याची भीती आहे. कन्हान नदीत राख अशीच मिसळत राहिली, तर पूर्व आणि उत्तर नागपुरातील पाणीपुरवठा बंद ( Water supply off ) करण्याची वेळ पाणीपुरवठा विभागावर येऊ शकणार आहे.
फ्लाय ऍशचा बंधारा ओव्हरफ्लो -नागपुरात मुसळधार पावसामुळे ( heavy rain ) कामठीच्या खसाळा येथील राखेचा बंधारा फुटून मोठे नुकसान झाले आहे. अशातच शनिवारपासून पडणाऱ्या पावसामुळे नागपुरकरांवर पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याचे संकट ओढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातून निघणाऱ्या फ्लाय ऍशचा बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. राखेचा बंधारा ओव्हरफ्लो झाल्याने येथील राखयुक्त पाणी कोलार नदीत मिसळले जात आहे. सतत पाऊस पडत असल्याने खापरखेडा औष्णीक विद्युत केंद्राची साठवणूक केंद्र असलेल्या वारेगाव एशपॉडमधून राखेच्या बंधाऱ्यातून 3 ठिकाणी लिकेज आहे. या लिकेजमधूम हे राखयुक्त पाणी कोलार नदीत मिश्रित होत असल्याचे समोर येत असल्याचे सेंटर फॉर सस्टनेबाल डेव्हलपमेंटच्या लीना बुद्धे यांनी ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे.
पाणीपुरवठा बाधित होण्याची शक्यता -कोलार नदी पाणी पुरवठा ओसिडब्ल्यूच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट जवळ कन्हान नदीत येऊन मिळते. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे नदीत औष्णिक वीज केंद्रातील राख मिसळत असल्याने ९ ते १५ जुलैपर्यंत वॉटर ट्रीटमेंट प्लांट बंद ठेवावा लागला होता. ज्यामुळे उत्तर आणि पूर्व नागपुरचा पाणीपुरवठा प्रभावित झाला होता. आता पुन्हा औष्णिक केंद्राची राख नदीत मिसळत असल्याने पुन्हा एकदा पाणीपुरवठा बाधित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.