नागपूर - सर्वत्र कोरोनाचे सावट असताना नागपूर विद्यापीठाने पदव्युत्तर प्रथम वर्षाची परीक्षा घेण्याची तारीख जाहीर केली होती. 5 ते 20 मे दरम्यान परीक्षा घेण्याच्या निर्णयाला महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला होता. यासोबतच प्राचार्य फोरमचे जेष्ठ सदस्य आर.जी. भोयर यांनीही पत्र लिहून परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. या सर्वांचा विचार करुन नागपूर विद्यापीठाकडून एका महिन्यासाठी परिक्षेला स्थगिती दिली आहे.
नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेला कोरोनाचा ब्रेक; एका महिन्यासाठी परीक्षा लांबणीवर - nagpur university exam time table
कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. त्यात परीक्षेच्या तारखा घोषित केल्याने परीक्षार्थी आणि महाविद्यालयांनी नाराजी दर्शवली होती. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी एका एम. टेक.च्या विद्यार्थ्याने अतिदक्षता विभागात दाखल असतानाही पेपर दिला. कोरोनाबाधित रुग्णांना पेपर देण्यासाठीचे कुठलेच नियोजन विद्यापीठाकडे नाही. त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात.
कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. त्यात परीक्षेच्या तारखा घोषित केल्याने परीक्षार्थी आणि महाविद्यालयांनी नाराजी दर्शवली होती. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी एका एम. टेक.च्या विद्यार्थ्याने अतिदक्षता विभागात दाखल असतानाही पेपर दिला. कोरोनाबाधित रुग्णांना पेपर देण्यासाठीचे कुठलेच नियोजन विद्यापीठाकडे नाही. त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात. प्राचार्य फोरमचे आर. जी. भोयर यांनी कुलगुरूंशी चर्चा करून ही परिस्थिती समजावून सांगितली. अशा काळातही परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाची परीक्षा घेणे, असे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या काळात परीक्षा देताना धोका वाढला असून अनेक अडचणी येऊ शकतात. शिवाय त्याचे नियोजन नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होईल, म्हणून परीक्षा रद्द करणे सोयीचे ठरेल. त्यामुळे विद्यापीठाने महिन्याभरासाठी परीक्षा रद्द केली असून या परीक्षा लांबणीवर गेल्या आहेत.