नागपूर- आगामी लोकसभेच्या निवडणुकाच्या तारखा घोषित झाल्या आणि सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ येथे देखील निवडणुकांच्या तारखा समोर येताच निर्धारित वेळापत्रकात बदल करावे लागले.
लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर - मतदान केंद्र
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ येथे निवडणुकांच्या तारखा समोर येताच निर्धारित वेळापत्रकात बदल करावे लागले.
नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जागांवर ११ एप्रिलला मतदान होणार आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासनाद्वारे १०, ११ व १२ या तारखांचे एकूण ७२ पेपर्स पुढे ढकलण्यात येणार आहे. लवकरच त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
मतदान केंद्र म्हणून साधारणपणे निवडणूक आयोग शाळा व महाविद्यालय अधिग्रहित करतात. केवळ मतदानाचा दिवस नाही तर त्या अगोदरचे २-३ दिवस देखील निवडणुकीचे काम तेथे सुरू असते. त्यामुळे विद्यापीठाने हा निर्णय घेतल्याची माहिती नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. आता पेपर पुढे ढकलल्यावर पुढे निकालाचे काय? असा प्रश्न निर्माण होतो. परंतु तोही आम्ही निर्धारित वेळेत लावू, असे येवले यांनी यावेळी सांगितले.