नागपूर- 'अरे ओ सांभा...' हा शोले चित्रपटातील गब्बरचा हा प्रसिद्ध डायलॉग सर्वांच्या परिचयाचा आहे. हा डायलॉग ऐकला की खलनायक सर्वांसमोर येतो. याच गब्बरच्या होर्डिंगची चर्चा सध्या नागपुरात होत आहे. नागपूर वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी हे होर्डिंग लावले आहेत.
'अरे ओ सांभा कितना जुर्माना है..?' - होर्डींग
नागपूर पोलिसांनी वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे म्हणून वेगळी शक्कल लढवत शहरात होर्डिंग लावून त्यावर शोले चित्रपटातील डायलॉगसह घोषवाक्य लिहिली आहेत. नागपूर वाहतूक पोलिसांनी लावलेले हे होर्डिंग्स वाहनधारकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
पोलिसांनी लावलेले होर्डींग
होर्डिंगवर 'अरे ओ सांभा कितना जुर्मना है रे, बिना लाईसेंस वाहन चलाने पर' 'जी.. 500 रुपये सरकार...', असे आशय लिहिले आहे. नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून केला जाणारा हा हटके जनजागृतीचा प्रकार नागपूरकरांवर किती परिणाम करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हेही वाचा - संपूर्ण एटीएमच केले लंपास!
Last Updated : Jan 1, 2020, 1:24 PM IST