नागपूर - जिल्ह्यात आज सकाळी पुन्हा सहा नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासह जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 507 झाली आहे. तर कोरोनामुळे एका वृद्ध भिक्षेकरीचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10 झाला आहे.
नागपूरात सहा नवीन रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू - नागपूर कोरोना अपडेट्स
नागपुरात आज सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 507 झाली आहे.
नागपूर कोरोना अपडेट्स
आज आढळलेल्या रुग्णांपैकी दोघे सतरंजीपुरा परिसरातील आहेत. तर एक तांडापेठ आणि एक एसआरपीएफ कॅम्पमधील जवान आहे. तर उर्वरित दोन रुग्ण नरखेड तालुक्यातील आहेत. नरखेडमधील दोन्ही रुग्ण गेल्या आठवड्यात मुंबईतून मन्नाथखेडी गावात परतले होते.
तर, नागपूरात आज एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. या रुग्णावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू होते.