महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिंताजनक! सलग दुसऱ्या दिवशी नागपुरमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूचा आकडा वाढला

गेल्या २४ तासात नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल ४ हजार १०८ नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे.

nagpur records 4108 Fresh Covid Cases In last 24 hours
चिंताजनक! सलग दुसऱ्या दिवशी नागपुरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढला

By

Published : Apr 3, 2021, 4:39 AM IST

नागपूर -सलग दुसऱ्या दिवशी नागपुरात ६० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्यामुळे नागपूरकरांची चिंता वाढली आहे. मात्र नागरिकांमध्ये बेफिकिरी किंचितही कमी झाल्याचे दिसत नाही. गेल्या २४ तासात नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल ४ हजार १०८ नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४० हजार ८०७ इतकी झाली आहे. उपराजधानी नागपूरमध्ये उपचारादरम्यान होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या राज्यातील इतर महानगरांपेक्षा खूप जास्त आहे.

सलग दुसऱ्या दिवशी नागपुरमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूचा आकडा वाढला
संपूर्ण नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे. एकीकडे कोरोनाबधितांचा आकडे सुसाट वेगाने वाढत असल्याने आता शासकीय आणि खासगी रुग्णालयात एकही बेड उपलब्ध राहिलेला नसल्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात ४ हजार १०८ रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी तब्बल १७ हजार ९० इतक्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये १३ हजार ३८४ इतक्या आरटीपीसीआर आणि ३ हजार ७०६ अँटीजेन टेस्टचा समावेश आहे. शुक्रवारी बाधित झालेल्या नागरिकांमध्ये १ हजार २४८ रुग्ण ग्रामीण नागपूरचे तर २ हजार ८५७ रुग्ण हे नागपूर महानगरपालिका हद्दीतील आहेत. शुक्रवारी ६० कोरोनाबधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूची संख्या ही ५ हजार २१८ इतकी झाली आहे.
प्रभावी उपाय योजनांची गरज
नागपूर जिल्ह्यात ज्या वेगाने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलेली आहे, हे पाहता महानगरपालिका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने देखील प्रभावी उपाययोजना आखून त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात पावले उचलण्याची गरज आहे. मात्र रुग्ण संख्या वाढत असताना आणि मृत्यूचे आकडे परिस्थिती हाता बाहेर गेल्याची ग्वाही देत असताना देखील ठोस उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details