नागपूर - होळीच्या दिवशी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या दारुबाज लोकांवर पोलिसांनी कारवाईचे हत्यार उपसले आहे. यात ६४० तळीरामांवर वाहतूक विभागामार्फत करवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून १ लाख ३१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
नागपूरमध्ये तळीरामांना दाखवला पोलिसी खाक्या, ६४० जणांवर कारवाई - DRINK
धुलिवंदनाचा सण साजरा करताना अनेक मद्यपी धुडगूस घालतात. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होतो. हा प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून यावेळी विशेष खबरदारी घेण्यात आली.
धुलिवंदनाचा सण साजरा करताना अनेक मद्यपी धुडगूस घालतात. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होतो. हा प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून यावेळी विशेष खबरदारी घेण्यात आली. होळीच्या दिवशी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत मद्यपींवर कारवाई केली. यात ९५७ वाहनाचालकांवर कारवाई झाली.
वाहतूक विभागामार्फत ६२० मद्यपींना पकडण्यात आले. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. गुरुवारी रात्री ही कारवाई झाली. या कारवाईमुळे कुठलीही अप्रिय घटना घडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत १ लाख ३१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.