महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात छुप्या पद्धतीने दारूची तस्करी, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त - नागपूर लॉकडाऊन इफेक्ट

लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने देखील बंद होती. मात्र, सरकारने तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने सुरू करण्याला परवानगी दिली आहे. तरीही नागपुरात मात्र दारूची दुकाने उघडली नाही. त्यामुळे तळीरामांचा घसा कोरडाच आहे. त्यासाठी दारू तस्करांनी छुप्या मार्गाने दारू आणण्यास सुरुवात केली आहे.

दारू तस्करी नागपूर  लॉकडाऊन दारू विक्री नागपूर  liquor seized nagpur  liquor selling in lockdown nagpur  nagpur latest news  नागपूर लेटेस्ट न्युज  नागपूर लॉकडाऊन इफेक्ट  nagpur lockdown effect
नागपुरात छुप्या पद्धतीने दारूची तस्करी, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त

By

Published : May 9, 2020, 10:14 AM IST

Updated : May 9, 2020, 11:07 AM IST

नागपूर - सरकराने परवनागी दिली असली तरी नागपुरात अद्यापही दारूची दुकाने उघडली नाही. मात्र, दारूची मागणी प्रचंड वाढल्याने तस्कर छुप्या मार्गाने शहरात दारू विक्रीसाठी आणली जात आहे. शहरात शुक्रवारी एका विशिष्ट बनावटीच्या ट्रकमधून दारू आणताना पोलिसांनी ट्रकसह २४ लाखांची दारू जप्त केली. बेलतरोडी परिसरात ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांची नजर चुकवून शहरात दारू आणण्यासाठी तस्कर नवनवीन शक्कल लढवत आहेत. शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या पथकाने वर्धा रोडवर दारू तस्करांचा ट्रक पकडला. मात्र, हा ट्रक रिकामा होता. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यामध्ये दारू आढळून आली. हा ट्रक बाहेरून रिकामा दिसत होता. मात्र, केबिनच्या मागे छुपे केबिन तयार केले होते. यामध्ये ७८ दारूची बॉक्स आढळून आले. प्रत्येकी एका बॉक्समध्ये ४८ याप्रमाणे ३ हजार ७४४ दारूच्या बाटल्या होत्या. मध्यप्रदेशातून या दारूची तस्करी महाराष्ट्रात सुरू होती. पोलिसांनी ट्रकसह एकूण २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. धक्कदायक बाब म्हणजे ट्रकच्या समोरील काचेवर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मधील एका फॅक्टरीचा अत्यावश्यक सेवेचे परवानगी पत्र चिटकवलेले होते. त्यामुळे हे परवानगी पत्र खरे आहे की बनावट? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Last Updated : May 9, 2020, 11:07 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details