महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरींना खंडणी मागणारा अटकेत; 'ही' महत्वाची माहिती समोर

नागपूर पोलिसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारा जयेश पुजारीला बेळगावमधून अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जयेश पुजारीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात तीन फोन कॉल करून शंभर कोटींची खंडणी मागितली होती.

Jayesh Pujari Arrested
नितीन गडकरी धमकी प्रकरण

By

Published : Mar 28, 2023, 4:35 PM IST

Updated : Mar 28, 2023, 4:56 PM IST

नागपूर पोलिस आयुक्त अमितेशकुमार माहिती देताना

नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कारागृहातुन धमकी देणाऱ्या जयेश कांथा उर्फ पुजारीला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 14 जानेवारीला रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारीने तीन फोन करून शंभर कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्याने 10 कोटी रूपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांनी बेळगाव तुरुंगात सर्च ऑपरेशन राबवल्यानंतर दोन सिमकार्ड जप्त केली आहेत. दरम्यान, नागपूर पोलिसांनी जयेश कांथा उर्फ पुजारीला अटक करून नागपूरला आणले आहे.

कोट्यावधींची मागली होती खंडणी : कर्नाटकच्या बेळगावमधील हिंडलगा जेलमध्ये असलेल्या जयेश पुजाराला एका प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कारागृहामधून जयेशने मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरातील जनसंपर्क कार्यालयात फोन करून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. जयेशच्या ताब्यासाठी नागपूर पोलिसांचे पथक मागच्या आठवड्यात बेळगावमध्ये दाखल झाले होते.

तरूणीला क्लीन चिट : बंगलोर येथील एका तरुणीच्या मोबाईलवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे मोबाईलवरून कॉल करण्यात आले. संबंधित प्रकरणाबाबतची माहिती झोन-2 चे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली होती. धक्कादायक माहिती म्हणजे ज्या तरुणीच्या मोबाईलवरून फोन आल्याचे उघड झाले आहे, त्या तरूणीने फोन केलाच नसल्याचे आणि तिचा कटात सहभाग आढळलेला नाही, यामुळे पोलिसांनी तिला क्लीन चिट दिली आहे.

तरूंगात तपासणी दरम्यान सापडले सिमकार्ड : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देऊन खंडणीची मागणी प्रकरणी कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे नागपूर पोलिस तळ ठोकून होते. त्यांनी बेळगावच्या कारागृहात सर्च ऑपरेशन राबवले. दरम्यान, नागपूर पोलिसांच्या हाती दोन सिमकार्ड लागले होते. हे सिम कार्ड वापरून मुख्य आरोपी जयेश कांथा उर्फ पुजारीने दोन महिन्यात वेळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जन-संपर्क कार्यालयात खंडणीसाठी धमकीचे फोन केले होते. दहा कोटी रुपयांची खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या जयेश कांथा उर्फ पुजारीची चौकशीसाठी नागपूर पोलीस बेळगावात गेली असता जेलमध्ये अकस्मात सर्च ऑपरेशन राबवले. यादरम्यान पोलिसांना दोन सिमकार्ड सापडले आहेत.

काय आहे प्रकरण : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील खामला येथे असलेल्या जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी सकाळी काही मिनिटांच्या अंतरात सलग तीन धमकीचे फोन आले होते. आरोपी जयेश कांथा उर्फ पुजारी नावाने संपर्क कार्यलयात धमकीचे फोन कॉल आले आहेत. यावेळी आरोपीने 10 कोटीची खंडणी मागितली. बंगलोर येथील एका तरुणीच्या मोबाईलवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन कॉल करण्यात आले होते, ज्या तरुणीच्या मोबाईलवरून फोन आल्याचे उघड झाले आहे, त्या तरूणीने फोन केला नसला तरी त्या तरुणीचा एक मित्र जयेश कांथा उर्फ पुजारी ज्या कारागृहात बंद असलेल्या कारागृहात कैदी आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांनी हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेतले व त्याचा तत्काळ तपास सुरू केला.

कोण आहे जयेश कांथा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नागपूर शहरातील बजाज नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणात जयेश कांथा नामक एका कुख्यात गुंडाचा सहभाग आढळून आला होता. जयेश हा बेळगाव कारागृहात कैद होता. त्याला 2016 मध्ये खुनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असल्यामुळे आरोपी फाशीची शिक्षा भोगत असल्याने त्यासंबंधीत कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेतले.

जयेशकडे सापडले अनेक नंबर :आरोपी जयेश कांथावर कारागृहातुन पळून जाण्याचा गुन्हा दाखल आहे तसेच खंडणी मगितल्याचा जुना रेकॉर्ड आहे. त्यावेळी नागपूर पोलिसांना जयेशच्या चौकशी दरम्यान, त्याच्याकडे एक डायरी सापडली होती. त्यात अनेक व्हीआयपी लोकांचे नंबर असल्याचे तपासातून उघड झाले आहे.

हेही वाचा : Bomb Outside Devendra Fadnavis House : फडणवीसांच्या नागपूर येथील घराबाहेर बॉम्ब? धमकीचा फोन; एक ताब्यात

Last Updated : Mar 28, 2023, 4:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details