महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर: शौचालय अनुदानाचा १२२ लाभार्थ्यांकडून दुरुपयोग; महापालिका करणार कारवाई

स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी मिळालेल्या अनुदानाचा दुरुपयोग करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेकडून या अनुदानाचा दुरुपयोग करणाऱ्या लाभार्थींवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

स्वच्छ भारत अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी मिळालेल्या निधीचा दुरुपयोग करणाऱ्या 122 जणांवर कारवाई करण्यात येणार आहे.

By

Published : Jun 16, 2019, 6:02 PM IST

नागपूर- स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी मिळालेल्या अनुदानाचा (निधी) दुरुपयोग करणाऱ्या लाभार्थींवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. १२२ लाभार्थींची यादी तयार झाली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्याकरीता महापालिकेने प्रक्रिया देखील सुरू केली आहे.

स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी मिळालेल्या अनुदानाचा दुरुपयोग करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेने अशा १२२ अर्जदारांवर कारवाई करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार महापालिकेने १२२ लोकांची यादी तयार केली आहे.

संदिप जोशी, सत्ता पक्ष नेता, महानगरपालिका, नागपूर.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत व्यक्तिगत शौचालय बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून चार हजार रुपये, राज्य सरकारकडून आठ हजार रुपये तसेच महानगरपालिकेकडून ४ हजार रुपये असे एकूण १६ हजार रुपये लाभार्थ्यांना दिले जातात. मध्यंतरीच्या काळात या योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा याकरीता अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार बारा हजार पाचशे लाभार्थ्यांची निवड झाली होती. दोन टप्प्यात आठ हजार रुपयांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा देखील करण्यात आले होते.

त्यानंतर महापालिकेने अनुदान दिलेल्या लाभार्थ्यांनी शौचालय बांधले की नाही, याचे सर्वेक्षण केले. मात्र, तब्बल १२२ लाभार्थींनी मिळालेले अनुदान अन्य दुसऱ्या कामात खर्च केल्याची बाब निदर्शनास आली. त्यानंतर महापालिकेने या १२२ लाभार्थ्यांवर कारवाई करत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिका कारवाई करणार या भीतीने काहींनी शौचालय बांधायला सुरुवात केल्याचा दावा सत्ताधारी पक्षनेता संदीप जोशी यांनी केले आहे

ABOUT THE AUTHOR

...view details