महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण

जिल्हा पालकमंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी यासंदर्भात टि्वट करून माहिती दिली.

By

Published : Sep 18, 2020, 12:05 PM IST

राऊत
राऊत

नागपूर - महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जिल्हा पालकमंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी यासंदर्भात टि्वट करून माहिती दिली. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी टि्वटद्वारे केले आहे.

नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत यांचे टि्वट

नितीन राऊत हे सध्या मुंबईमध्ये आहेत. तर, नागपूरात राहणाऱ्या त्यांच्या पत्नीला सुद्धा कोरोनाची लागण झाली असून त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल मुंबई येथे आयोजित एका बैठकीत नितीन राऊत सहभागी झाले होते.

नागपूरमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित अॅग्रोटेक केंद्र उभारण्यासाठी नितीन राऊत यांनी बुधवारी मुंबईत टाटा टेक्नोलॉजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली होती. हे केंद्र उभारण्याच्यादृष्टीने नागपूर परिसराचा आणि राज्याच्या कृषी क्षेत्राचा बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांना आयसोलेट करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य ते उपचार देखील सुरू आहेत. आतापर्यंत अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details