महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nagpur Crime News: राज्याच्या उपराजधानीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, 24 तासांत तिघांची हत्या - नागपुर शहरात तीन हत्येच्या घटना

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात नागपूर शहर पोलिसांना यश आल्याचा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केलेला दावा फोल ठरला आहे. कारण गेल्या 24 तासांत नागपुर शहरात तीन हत्येच्या घटना घडल्या आहेत. गुन्हेगारीच्या वाढत्या प्रकरणांमुळे पोलीस प्रशासनावर देखील आता प्रश्न उपस्थित होतोय.

Nagpur Crime News
नागपुर शहरात तीन हत्येच्या घटना

By

Published : Aug 21, 2023, 10:16 AM IST

नागपुर शहरात तीन हत्येच्या घटना

नागपूर :वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागपूर पुन्हा एकदा हादरलं आहे. शहरात 24 तासांत वेगवेगळ्या घटनेत तिघांची हत्या झालीय. त्यामुळे नागपुर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गुंडाची हत्या झाली आहे. तर जरीपटका हद्दीत एका मजुराचा खून झाला आहे. याशिवाय काही दिवसांपासून बेपत्ता ट्रक चालकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह हा काटोल नाका परिसरात मिळाला.


पहिली घटना : ही घटना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. महेशकुमार नकालसिंग उईके (30) असे हत्या झालेल्या मृत्यूचे नाव आहे. तर राजकुमारी उईके आणि करण उईके असे आरोपींची नावे आहेत. मृतक आणि सर्व आरोपी मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. महेशकुमार नकालसिंग उईके हा जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होता. त्याच्याशेजारी करण उर्फ भारती उईके आणि राजकुमारी उईके दोघे राहत होते. तक्रारदार विष्णू भलावी आणि आरोपी हे दोघेही दारू पित असताना महेशने तक्रारदाराला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

मारहाणीत झाला मृत्यू : महेशने विष्णूला तुझ्यात आणि राजकुमारीमध्ये चक्कर सुरू आहे, असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर महेशने राजकुमारीला जोरजोराने शिवीगाळ करण्यात सुरुवात केली. तिनेही घराबाहेर येऊन महेशला शिवीगाळ केली असता त्याने तिलाही हातबुक्कीने मारहाण केली. धक्का दिल्याने ती खाली पडून तिच्या डोक्याला मार लागला. ते पाहून करण उईके याने रूममधून लोखंडी रॉड आणून महेशला मारहाण केली. राजकुमारीनेही लाकडी काठीने महेशला मारहाण केली. यामध्ये महेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.


दुसरी घटना :खूनाची दुसरी घटना यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. कांजी हाऊस या चौकात बादल पडोळे नावाच्या गुंडाची चेतन सूर्यवंशीसह अन्य तीन ते चार साथीदारांनी हत्या केली. मृत बादल पडोळे आणि आरोपी चेतन सूर्यवंशी हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. घटनेची माहिती समाजल्यानंतर यशोधरा नगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.


  • तिसरी घटना : खूनाची तिसरी घटनाकाटोल नाका चौकात उघडकीस आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा :

  1. Nagpur Crime News: बेपत्ता झालेल्या 'त्या' दोघांच्या खूनाचे गूढ उकलले; नदी पात्रात सापडला एकाचा अर्धवट जळालेला मृतदेह
  2. Nagpur Crime News: नादुरुस्त कारचे दार आतून उघडता न आल्याने तीनही मुलांचा गुदमरून म्रुत्यु झाल्याचा अंदाज- पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
  3. Nagpur Crime News : धक्कादायक ! २४ तासात जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनेत चौघांची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details