नागपुर - शहरात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे सात नवे रुग्ण आढळले. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 105 झाली आहे.
नागपुरात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातने वाढ, एकूण आकडा १०५ वर - नागपूर कोरोना पेशंट
नव्याने पुढे आलेल्या रुग्णांचे मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा कनेक्शन असल्याने प्रशासनाने त्यांना आधीच क्वारंटाईन केले असल्याची माहितीसुद्धा समोर आली आहे.
नव्याने पुढे आलेल्या रुग्णांचे मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा कनेक्शन असल्याने प्रशासनाने त्यांना आधीच क्वारंटाईन केले असल्याची माहितीसुद्धा समोर आली आहे. गुरुवारी दिवसभरात नागपुरात एकही नवा कोरोना रुग्ण समोर आला नव्हता. ज्यामुळे कोरोना बधितांची संख्या 98 वर स्थिरावली होती, पण आज तब्बल सात रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ही संख्या आता 105 झाली आहे. नागपूरात कोरोनाचा पहिला रुग्ण 12 मार्चला समोर आला होता, ज्यानंतर 43 दिवसांत हा आकडा शंभरावर पोहचला आहे. तर दुसरीकडे कोरोना विषाणूंचा यशस्वी मुकाबला करून 17 रुग्ण सुखरूप घरी परतले आहेत.