महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Child Kidnapped In Nagpur : आईच्या कुशीतून चिमुकल्याचे अपहरण, पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या - चिमुकल्याचे अपहरण

फुटपाथवर झोपलेल्या महिलेच्या कुशीतून तीन महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण करण्यात आल्याने नागपुरात खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी शोध मोहीम राबवत या चिमुकल्याची नागपूर पोलिसांनी सुटका केली आहे.

Child Kidnapped In Nagpur
संपादित छायाचित्र

By

Published : Jun 3, 2023, 1:52 PM IST

नागपूर :आईच्या कुशीत झोपलेल्या तीन महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण झाल्याने नागपुरात मोठी खळबळ उडाली होती. ही घटना नागपूरच्या मोमीनपुरा भागात गुरुवारी घडली. चिमुकल्याचे आईच्या कुशीतून अपहरण झाल्याची माहिती तहसील पोलीस ठाण्यातील जवानांना समजताच पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. नागपूर पोलिसांकडून शहरभर युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दोनशे पोलीस कर्मचाऱ्यांनी दिवसभर रस्त्यावर उतरून चिमुकल्याचा शोध घेतला. अखेर रात्री उशिरा अपहरण झालेला चिमुकला जरीपटका परिसरामधील एका महिलेकडून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

फुटपाथवर चिमुकल्यासह झोपली होती आई :गुरुवारी रात्री रिहाना परवीन या आपल्या चार मुलांना घेऊन नागपुरात आल्या होत्या. मोमीनपुरा परिसरातील मशिदीजवळ फुटपाथवरच त्या झोपल्या होत्या. मात्र पहाटेच्या सुमारस त्यांना जाग आली असता, कुशीत झोपलेला तीन महिन्याचा चिमुकला गायब असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांच्या पायाखालची मातीच सरकली. त्यांनी परिसरात शोधाशोध केली मात्र, चिमुकला आढळला नसल्याने त्यांनी अखेर तहसील पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.

पोलिसांनी केली शोध मोहीम सुरू : शहरातून चिमुकल्याचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर ट्राफिक पोलिसांपर्यंत सर्वांना माहिती देण्यात आली. एका पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. याशिवाय सोशल मीडियावर देखील पोलिसांकडून मुलाचा फोटो शेअर करण्यात आला.

अखेर सापडला चिमुकला :सीसीटीव्हीच्या शोध घेतल्यानंतर पोलिसांना या चिमुकल्याचा माग काढला. यावेळी खबऱ्याने हा चिमुकला जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेकडे असल्याची पक्की खबर दिली. पोलिसांनी तात्काळ तेथे जाऊन शोध घेतला असता शबनम नावाच्या महिलेकडे चिमुकला आढळून आला. पोलिसांनी शबनम नावाच्या महिलेला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी चिमुकल्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले. चिमुकल्याचे अपहरण झाल्याने त्याची आई अतिशय घाबरली होती. त्या बोलण्याच्या स्थितीत देखील नव्हत्या. मात्र पोलिसांनी त्यांना धीर देत चिमुकला सूखरुप परत केला आहे. चिमुकला शबनम या महिलेपर्यंत कसा गेला, याचा शोध आज पोलीस घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Kolhapur Crime: मूल नसल्याने चिमुकल्याचे अपहरण; आरोपी दाम्पत्याला 48 तासात अटक
  2. Mumbai Boy Found In Andhra Pradesh : अपहरण करून आणलेल्या मुलाला लागला लळा, पोलिसांनी घेऊन जाताच कुटुंबियांना अश्रू अनावर!
  3. Thane Crime News: पोलिसांनी चिमुकल्याला पोहोचवले सुखरूप आईच्या खुशीत; अपहरण करून झारखंडमध्ये विक्री करणाऱ्या त्रिकुटाला ठोकल्या बेड्या

ABOUT THE AUTHOR

...view details