नागपूर - हिंदू धर्मातील महत्वाच्या सणांपैकी एक म्हणजे होळी. मराठी वर्षातील हा शेवटचा सण आहे. हा सण साजरा करण्यासाठी नागपूर नगरी रंगपंचमीच्या तयारीसाठी सज्ज झाली आहे. शहारातील मुख्य बाजारपेठा रंगपंचमीच्या साहित्याने बहरुन गेली आहे.
शहरातील बाजारपेठेत होळीसाठी लगबग
नागपुरातील इतवारी ही प्रसिद्ध बाजारपेठ सध्या होळीच्या साहित्याने बहरून गेली आहे. विविध प्रकारच्या आकर्षक रंगाच्या पिचकाऱ्या, आवाज करणारे पिपाण्या सोबतच, विविध प्रकारचे मुखवटे बाजारात दिसून आले.
होळीच्या पाठोपाठ रंगपंचमीचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यामुळे छोट्या बालकांपासून ते मोठ्यापर्यंत या रंगात बुडून जातात. नागपुरातील इतवारी ही प्रसिद्ध बाजारपेठ सध्या होळीच्या साहित्याने बहरून गेली आहे. विविध प्रकारच्या आकर्षक रंगाच्या पिचकाऱ्या, आवाज करणारे पिपाण्या सोबतच, विविध प्रकारचे मुखवटे बाजारात दिसून आले. महत्वाचे म्हणजे यावेळी पर्यावरणाचे जतन व तसेच त्वचेचे होणारे रोग टाळण्यासाठी रासायनिक रंगाऐवजी मोठया प्रमाणात नैसर्गिक रंग विकल्या जात आहे. दुकानदार कामात व्यस्त आहेत सगळीकडे रंग व रंगपंचमीचे साहित्यांची दुकाने थाटल्या गेली आहे.