महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विदर्भावर अवकाळीचे सावट, अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

विदर्भात १५ आणि १६ फेब्रुवारीला जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याची सूचाना प्रसासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Feb 15, 2019, 9:47 AM IST

नागपूर- शहरासह विदर्भावर अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. कारण विदर्भातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता होण्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. याशिवाय गारपीट होण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याचे अधिकारी माहिती देताना

उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे विदर्भात अजूनही थंडी ठाण मांडून बसलेली आहे. असे असताना बंगालच्या समुद्रात चक्री वादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विदर्भात १५ आणि १६ फेब्रुवारीला पावसाची तसेच एखाद्या ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. त्यानंतर १७ फेब्रुवारीला पुन्हा विदर्भात थंडी पडणार असल्याचा अंदाजदेखील हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details