महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CAA आंदोलन : मुस्लीम बांधवांचा विधानभवनावर मोर्चा, आरक्षणाची मागणी - नागरिकत्व दुरुस्ती कायदा

नागपूर विधानभवनावर मुस्लीम बांधवांनी भव्य मोर्चा काढला. या अधिवेशना दरम्यानचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा आहे. जमात-ए-इस्लामी हिंद या संघटनेसोबत मुस्लीम विद्यार्थी परिषद, मुस्लीम महिला संघटनानी देखील या आंदोलनात सहभाग घेतला.

Muslim community agitation against CCA
मुस्लीम बांधवांचा विधानभवनावर मोर्चा

By

Published : Dec 19, 2019, 7:27 PM IST

नागपूर- एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्या (Citizenship Amendment Act 2019) विरोधात देशात वातवरण तापले आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागपूर विधानभवनावर मुस्लीम बांधवांनी भव्य मोर्चा काढला. या अधिवेशनातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा आहे. जमात-ए-इस्लामी हिंद या संघटनेसोबत मुस्लीम विद्यार्थी परिषद, मुस्लीम महिला संघटनानी देखील या आंदोलनात सहभाग घेतला.

मुस्लीम बांधवांचा विधानभवनावर मोर्चा

हेही वाचा - रोहतगी यांना खटल्यातून हटवून सरकारने स्वतःची दिवाळखोरी दाखवली - विनायक मेटे

काँग्रेस-राष्ट्रवादीने 2014 ला मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण दिले होते. मात्र, फडणवीस सरकारने ते नाकारले. ते आरक्षण परत देण्यात यावे, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details