नागपूर -नागपूर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाल परिसराच्या शिवाजी पुतळा मार्गावर दोन आरोपींनी संगनमत करून एका कुख्यात गुंडाचा खून केला आहे. शानु उर्फ शहनवाज असे मृतकाचे नाव आहे. शानुचा खून करणारे दोन्ही आरोपी कोण आहेत आणि खूनामागे काय कारण आहेत, या संदर्भात पोलिसांनी खुलासा केलेला नाही.
आज (शुक्रवारी) सकाळी मृतक शानु उर्फ शहनवाज हा महाल परिसरातील गांधी गेट मार्गे गणेशपेठकडे जात असताना दोघांनी त्याची वाट अडवली. सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली असताना दोन्ही आरोपींनी संगनमत करून शानुवर धारधार शस्त्रांनी वार केले. ज्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला होता. घटनेची माहिती समजताच कोतवाली आणि गणेशपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. कोतवाली पोलिसांनी त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने गुन्ह्यांची नोंद कोतवालीमध्ये करण्यात आली आहे. पोलिसांना घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
मृतक शानुवर अनेक गंभीर गुन्हे