महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Murder in Nagpur : दारुच्या नशेत वाद, मित्राची हत्या; नागपुरमध्ये मार्चमध्ये पुन्हा हत्यासत्र सुरू

नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ( Kalmana Police Station Area ) एका तरुणची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ( Murder in Nagpur ) विक्रांत उर्फ भुरू बंडगर, असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Murder in Nagpur
नागपुरमध्ये मार्चमध्ये पुन्हा हत्यासत्र सुरू

By

Published : Mar 16, 2022, 3:00 PM IST

नागपूर -शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ( Kalmana Police Station Area ) एका तरुणची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ( Murder in Nagpur ) विक्रांत उर्फ भुरू बंडगर, असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. विक्रांतची हत्या त्याच्याच मित्राने केली आहे. गण्या उर्फ गणेश शालीकराम बेडेवार असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत विक्रांत उर्फ भुरू आणि आरोपी गण्या उर्फ गणेश हे दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. काल दोघेही एकत्र दारू पीत बसले होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद निर्माण झाला. भुरूच्या टोचून बोलण्यावरून संतलेल्या गण्याने त्याच्या जवळ असलेल्या चाकूने भुरुच्या गळ्यावर वार केला. आरोपी एवढ्यावर थांबला नाही. त्याने भुरूवर दगडाने हल्ला चढवला होता. भुरूला रक्ताच्या थारोळ्यात लोळवल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती समजताच, कळमना पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी भुरूला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

हेही वाचा -Angadiya extortion case : डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचा वॉन्टेड आरोपी म्हणून रिमांड अर्जामध्ये उल्लेख

दारूच्या नशेत धुत आरोपीला अटक -

विक्रांत उर्फ भुरूची हत्या झाल्यानंतर कळमना परिसरात तणाव निर्माण झाला होता. नागपूर पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. तपास सुरू होताच पोलिसांनी आरोपी गण्या उर्फ गणेशला तत्काळ अटक केली. ज्यावेळी आरोपी हा पोलिसांच्या हाती लागला तेव्हा तो दारूच्या नशेत होता. यानंतर याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. फेब्रुवारीमध्ये नागपूर शहरात एकही खुनाची घटना घडली नाही. म्हणून नागपूर पोलिसांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. मात्र, मार्च महिन्यात एकामागून एक खुनाच्या घटना घडत असल्याने आता नागपूर पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details