नागपूर - कोरोनाच्या या संकटकाळात कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना येणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे पीपीई किट्सची आहे. पीपीई म्हणजेच पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट. रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर, नर्सेस व स्वच्छता कर्मचाऱ्यांना या किट्सचा वापर करावा लागतो. एकदा वापर केलेली किट परत वापरता येत नव्हती. मात्र, आता त्या किटचे निर्जंतुकीकरण करुन वापरता येणे शक्य आहे.
पीपीई किट निर्जंतुकीकरणाचा प्रश्न मार्गी... - corona update
कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना येणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे पीपीई किट्सची आहे. पीपीई म्हणजेच पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट. रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर, नर्सेस व स्वच्छता कर्मचाऱ्यांना या किट्सचा वापर करावा लागतो. एकदा वापर केलेली किट परत वापरता येत नव्हती. मात्र, आता त्या किटचे निर्जंतुकीकरण करुन वापरता येणे शक्य आहे.
पीपीई किट्स 10 ते 12 तास वापरल्यानंतर सरळ काचारपेटीत टाकावी लागते. एक पीपीई किट हजार ते पंधराशे रुपयाला पडते. एवढ्या मोठ्या प्रमाणात किट दररोज लागत असल्याकारणाने एकदा वापरून त्या किटचे निर्जंतुकीकरण करून पुन्हा त्या वापरता येतील यादिशेने आता प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना यश देखील मिळाले आहे. राज्यसभा खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांनी याकरिता पुढाकार घेतला आहे. राजस्थानच्या जोधपूर येथील एम्स ने याबाबत चाचणी केली असून, ही चाचणी यशस्वी देखील झाली आहे. अल्ट्राव्हायोलेट व मायक्रोवेव्ह तंत्राचा वापर करून पीपीई किटचे निर्जंतुकीकरण करता येते. पीपीई किटचे निर्जंतुकीकरण करून पुन्हा त्या वापरयोग्य बनवण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ती वापरण्यात येईल, असे डॉक्टर महात्मे यांनी सांगितले. यामुळे देशात पीपीई किट चा निर्माण झालेला तुटवडा पूर्ण होईल.