नागपूर -यावर्षी मान्सून निर्धारित वेळेच्या तीन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला असला आहे. तरीही उष्णतेने होरपळलेल्या विदर्भात पावसाळ्याची पहिली सर 10 जूननंतरच येण्याची शक्यता असल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून ( Nagpur Regional Meteorological Department ) देण्यात आली आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारपणे 10 ते 15 दिवसांत मान्सून विदर्भात दाखल होतो. त्यासाठी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणे गरजेचे आहे.
माहिती देताना हवामान विभागाचे संचालक बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतरच विदर्भात पावसाचे आगमन होते. मात्र, सध्या तशी कोणतीही स्थिती तयार झाली नसल्याने पुढील 5 दिवस पावसाची शक्यता नसल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिली आहे. शिवाय पुढील 3 दिवस नवतपाच्या गर्मीपासूनही दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तापमान कमी, पण उकाडा -संपूर्ण विदर्भ सध्या नवतापाच्या उष्णतेमुळे होरपळून निघाला आहे. त्यामुळे प्रत्येकाचे डोळे मान्सूनच्या आगमनाकडे लागले असताना तीन दिवस आधीच मान्सूनचे केरळ दणक्यात आगमन झाल्यानंतर यावर्षी विदर्भातही लवकर पावसाचे आगमन होईल, अशी आशा होती. मात्र, सध्या तशी शक्यता नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
10 जूननंतरच मान्सूनच्या आगमनाची शक्यता -हवामान विभागाच्या माहितीनुसार विदर्भात मानसूनचे आगमन कधी होईल या प्रश्नाचे उत्तर मान्सूनच्या गतीवर निर्धारित आहे. येत्या दोन दिवसात त्यावर स्पष्टपणे माहिती देता येईल. मात्र, सध्या विदर्भात मान्सून निर्धारित वेळेवर दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा -Electric Bike Issue Nagpur : इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री जोरात; कायद्याची माहिती नसल्याने विक्रेत्यांकडून ग्राहकांची फसवणूक