नागपूर -शहरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. या मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्यांना अखेर दिलासा मिळला आहे. राज्यात सगळी कडे पाऊस असतांना विदर्भावर मात्र वरून राजा रुसला होता. तुरळक पावसामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र, पावसाच्या दमदार एन्ट्री ने बळीराजा देखील सुखावलाय.
मेघगर्जनेसह पावसाची दमदार एन्ट्री; उकड्यामुळे त्रस्त नागपूरकर सुखावले
अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. विदयार्थी आणि हातगाडीवाल्या दुकानदारांना आडोसा घ्यावा लागला. मुसळधार पाऊसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. उकड्यामुळे हैरान झालेल्या नागपूरकरांना दिलासा मीळाला आहे. पेरणी करून पावसाची चातका सारखी वाट बघनारा शेतकरी सुखवलाय.
मेघगर्जनेसह पावसाची दमदार एन्ट्री; उकड्यामुळे त्रस्त झालेले नागपूरकर सुखवले
अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. विद्यार्थी आणि हातगाडीवाल्या दुकानदारांना आडोसा घ्यावा लागला. मुसळधार पाऊसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. उकड्यामुळे हैरान झालेल्या नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे. पेरणी करून पावसाची चातकासारखी वाट बघणारा शेतकरी सुखवलाय. अजून दमदार पावसाची आवश्यकता असून. आलेल्या पावसाने जलसाठयांच्या पातळीत वाढ होईल आणि पाणीटंचाईची समस्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.