नागपूर-कोरोना नियंत्रणासाठी नागपुरात आयुर्वेदिक कोरोना रक्षक कीटचे वितरण केले जात आहे. सर्वाधिक रुग्ण स्लम भागातूनच येत असल्याने त्या भागात आयुर्वेदिक कीटचे वितरण केले जात आहे. आयुष मंत्रालयाच्या पुढाकाराने हा उपक्रम नागपूर शहरात राबविण्यात येत आहे.
नागपुरात आयुष मंत्रालयाकडून कोरोना रक्षक किटचे वितरण सुरू - कोरोना रक्षक किट
कोरोना नियंत्रणासाठी नागपुरात आयुर्वेदिक कोरोना रक्षक कीटचे वितरण केले जात आहे. आयुष मंत्रालयाच्या पुढाकाराने स्लम भागात नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यावर भर दिला जात आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ८० हजार झाली आहे. तसेच मृत्युदर देखील वाढत आहे. प्रशासनाच्या अनेक प्रयत्नानंतर देखील कोरोना वेगाने पसरत आहे. त्यामुळे आता आयुष मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. विशेषतः स्लम भागातील नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येनं होत असल्याचं निदर्शनास आलं आहे.
केंद्रीय आयुष मंत्रालयाच्यावतीने शहराच्या स्लम भागातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्यावर भर दिला जातोय. यासाठी घरोघरी जाऊन आयुर्वेदिक किटचं वाटप केले जात आहे. या किटमध्ये च्यवनप्राश, आयुर्वेदिक गोळ्या, काढा आणि अनुतेल'चा समावेश आहे. या आयुर्वेदिक औषधांमुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचं आयुष मंत्रालयाचं संशोधन आहे. त्यामुळे या आयुर्वेदिक औषधांचा नागरिकांना फायदा होणार असून कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात काहीशी मदत होईल.