नागपूर -मुंबई मनपा क्षेत्रातील ( Municipal Corporation Employee ) शाळा, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, सफाई कामगार आणि अधिकारी यांच्या विविध मागण्यांबाबत ( Uday Samant Statement On Municipal Employee Demand ) राज्य शासन सकारात्मक आहे. टप्प्याटप्प्याने त्यांना सर्व सोयी लागू करण्याबाबत अधिवेशनानंतर एक बैठक घेऊन पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant Statement ) दिली. मनपाच्या शाळा तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अनुषंगाने सदस्य कपिल पाटील यांनी लक्षवेधी मांडली, यावर सामंत यांनी उत्तर दिले.
नियमांची पूर्तता केल्यानंतर गुणवत्तेनुसार मालमत्ता करात सूटबृहन्मुंबई महापालिका ( Municipal Corporation Employee ) क्षेत्रातील खासगी संस्थांद्वारे चालविल्या जाणाऱ्या खासगी प्राथमिक शाळांना राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. सदर शाळांना अनुदान सहाय्य संहिता १९६८ मधील तरतुदी लागू आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका ( Municipal Corporation Employee ) क्षेत्रातील सर्व प्रकारच्या शाळांना नियमांची पूर्तता केल्यानंतर गुणवत्तेनुसार मालमत्ता करात सूट देण्यात येत असल्याचे मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant Statement ) यांनी सांगितले. खासगी संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबत शासन सकारात्मक आहे.
कुटुंबियांना महापालिकेच्या रुग्णालयात आरोग्य सेवा मोफतबृहन्मुंबई महापालिकेतील ( Municipal Corporation Employee ) लिपिक व तत्सम पदावर १० वर्ष पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्याच्या अनुषंगाने बृहन्मुंबई मनपामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. बृहन्मुंबई महापालिकेतील कामगार, कर्मचारी व अधिकारी यांना वैद्यकीय गटविमा योजना लागू करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही तसेच कर्मचाऱ्यांना व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना बृहन्मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात काही आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचेही मंत्री सामंत ( Uday Samant Statement On Municipal Employee Demand ) यांनी सांगितले.
सरळसेवा पद भरती टप्प्याटप्प्याने करणारबृहन्मुंबई महापालिकेच्या विविध विभागातील नवीन सरळसेवा पद भरती टप्प्याटप्प्याने करण्यात येत असून, पद भरतीचे प्रस्ताव कार्यान्वित आहेत. तसेच, बृहन्मुंबई महापालिकेच्या ( Municipal Corporation Employee ) सर्व रुग्णालयांतील परिचारिका संवर्गाच्या रिक्त पदांची बिंदुनामावली पडताळणी करून घेण्यात आली आहे. सदर रिक्त पदे भरण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये परिचारिका ( Uday Samant Statement On Municipal Employee Demand ) संवर्गाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन ती भरण्यात येणार आहेत. तसेच लाड-पागे समितीच्या शिफारशींअन्वये वारसाहक्क धोरणांतर्गत कर्मचाऱ्यांच्या वारसास नोकरी देय आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे, असेही सामंत यांनी सांगितले. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ( Municipal Corporation Employee ) सफाई कर्मचाऱ्यांना मोफत निवासस्थाने देण्याच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.