नागपूर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रावण मासानिमित्त शिवार्चना केली. तसेच त्यांनी लोककल्याण आणि राष्ट्र संवर्धनासाठी महादेवाला साकडंही घातलं आहे. नागपूरच्या भारत विकास परिषदेच्यावतीने लघुरुद्र आणि जलाभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही महादेवाची विधीवत पूजा केली.
श्रावण सोमवारनिमित्ताने नितीन गडकरींनी केला शंकराचा जलाभिषेक - पूजा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रावण मासानिमित्त शिवार्चना केली. तसेच त्यांनी लोककल्याण आणि राष्ट्र संवर्धनासाठी महादेवाला साकडंही घातलंय.
जलाभिषेक
श्रावण महिन्यातील शंकराच्या पूजेचे एक वेगळे महत्त्व असते, त्यामुळे श्रावणात मोठ्या प्रमाणात भाविक महादेवाची पूजा करतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही शिवभक्त आहेत. त्यांनीही नागपुरातील शिवमंदिरात शिवार्चना केली. यावेळी परिसरातील शिवभक्तांचीही मोठी गर्दी होती.