नागपूर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी समाजाच्या सर्व घटकातील नेते, कार्यकर्ते, समर्थक आणि चाहत्यांची रामनगरातील 'भक्ती' बंगल्यावर लक्षणीय गर्दी झाली होती. यानिमित्ताने नितीन गडकरी यांच्याहस्ते गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वाढदिवसानिमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप - minister
यावेळी गरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वाढदिवसानिमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप
यावेळी गरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. गडकरींचा हा ६३ वा वाढदिवस असल्याने ६३ या संख्येचा संयोग घडवून आणत अनेकांनी त्यांना भेटवस्तू स्वरुपात अनोख्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्ताने शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.