नागपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नागपूर दौऱ्यावर आहेत. मराठा आरक्षणावरून विनायक मेटेंनी राजकारण करू नये. अशोक चव्हाण हे उत्तम काम करत आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवाय मराठा आरक्षणावरून राज्य सरकारदेखील अनेकवेळा विविध बैठका घेऊन चर्चा करत असल्याचेही थोरात यांनी सांगितले. त्यामुळे विनायक मेटेंच्या आरोपात काही तथ्य नाही, असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाबाबत विनायक मेटेंनी राजकारण करू नये - बाळासाहेब थोरात - नागपूर बातमी
नागपुरातील कोरोनाच्या स्थितीबाबत प्रशासकीय अधिकारी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणावर बोलताना, विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणावरून राजकारण करू नये. अशोक चव्हाण व समितीच्या माध्यमातून याबाबत उत्तम काम सुरू असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
नागपुरातील कोरोनाच्या स्थितीबाबत प्रशासकीय अधिकारी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणावर बोलताना, विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणावरून राजकारण करू नये. अशोक चव्हाण व समितीच्या माध्यमातून याबाबत उत्तम काम सुरू असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. त्यामुळे विनायक मेटे यांच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे थोरात यांनी सांगितले. शिवाय राज्य सरकार म्हणून कोरोनाची संपूर्ण परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात कशी आणता येईल यासाठी सरकार म्हणून महाविकास आघाडी प्रयत्न करत असल्याचेही थोरात यांनी सांगितले. नागपूरात प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून शहरातील कोरोना स्थितीबाबत माहिती घेऊन संबंधित नियोजन करण्याचे आदेश देण्यात आल्याचे यावेळी थोरात यांनी सांगितले. त्याचबरोबर कोरोनाच्या या काळात राज्याचे मुख्यमंत्री स्वतः उत्तम काम करत असल्याचेही थोरातांनी सांगितले.
कोरोनाच्या या काळात राज्य सरकारकडून सर्वाधिक कोरोना चाचणी केल्या जात असल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही थोरात यांनी सांगितले. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळाला आहे. त्यामुळे सरकार म्हणून संकटाच्या काळातही लोकांच्या हिताचेच निर्णय घेतल्या जात असल्याचेही थोरात यांनी सांगितले. शिवाय सुशांत सिंग राजपूत प्रकरणाबाबत विचारले असता याबाबत चौकशी सुरू आहे. त्यामुळे यावर भाष्य करणे चुकीचे असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.