नागपूर -सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची सुनावणी ११ तारखेला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पुढची कारवाई करू, असे अनिल देशमुख म्हणाले. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा मुंबई पोलीस अतिशय सक्षमपणे तपास करत असल्याचेही देशमुख म्हणाले.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण: मुंबई पोलिसांचा अतिशय सक्षमपणे तपास सुरू - अनिल देशमुख
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची सुनावणी ११ तारखेला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पुढची कारवाई करू, असे अनिल देशमुख म्हणाले.
गेल्या दीड महिन्यापासून सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून राष्ट्रीय राजकारण तापले आहे. बिहार सरकार महाराष्ट्र पोलिसांच्या तपासावर असमाधानी असल्याने त्यांनी सीबीआय चौकशीचा आग्रह धरला होता. दरम्यान, बिहार येथे दाखल झालेल्या तक्रारीनंतर बिहार पोलिसांचे एक पथक तपासासाठी मुंबईला आले होते. त्यांच्या अधिकाऱ्याचे विलागीकरण केल्यानंतर दोन राज्यातील संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस अतिशय सक्षमपणे करत असल्याचा दावा महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. या प्रकरणाची सुनावणी ११ तारखेला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पुढची कारवाई करू असे अनिल देशमुख म्हणाले आहेत.