महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरुणीवर चौथी शस्त्रक्रिया, प्रकृती नाजूकच

रविवारी सकाळी पीडित तरुणीवर चौथी शस्त्रक्रिया करण्यात आली. पीडितेच्या शरीरावरील जखमा स्वच्छ करून तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. पीडितेला आज रक्त दिले जाणार आहे. जो पर्यंत ती स्वतः श्वास घेऊ शकत नाही, तो पर्यंत व्हेंटिलेटर सुरू राहिल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली

By

Published : Feb 9, 2020, 3:15 PM IST

nagpur
हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरुणीवर चौथी शस्त्रक्रीया

नागपूर -हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची प्रकृती अजुनही गंभीरच आहे. सहा दिवस उलटून गेल्यानंतरही पीडितेची मृत्यूशी झुंज सुरूच आहे. रविवारी पीडित तरुणीच्या प्रकृतीसंदर्भातील मेडीकल बुलेटीन रुग्णालयाने प्रसिद्ध केले आहे. पीडितेची प्रकृती स्थिर असून नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरुणीवर चौथी शस्त्रक्रीया

हेही वाचा -हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरुणीची मृत्यूशी झूंज अद्याप सुरूच

रविवारी सकाळी पीडित तरुणीवर चौथी शस्त्रक्रिया करण्यात आली. पीडितेच्या शरीरावरील जखमा स्वच्छ करून तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. पीडितेला आज रक्त दिले जाणार आहे. जो पर्यंत ती स्वतः श्वास घेऊ शकत नाही, तो पर्यंत व्हेंटिलेटर सुरू राहिल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. पीडितेला कृत्रिम अन्ननलिकेतून अन्न दिले जात असून एक ते दीड महिन्यात चांगला प्रतिसाद मिळाला तर अनेक तिच्या प्रकृतीत सुधारणा दिसतील. पीडितेची प्रकृती स्थिर असली तरी हा स्ट्रेसफुल कालावधी आहे, अस डॉक्टरांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details