महाराष्ट्र

maharashtra

भाजप आणि काँग्रेस सत्ता आल्यावर भ्रष्टाचार करतात - मायावती

By

Published : Apr 5, 2019, 6:01 PM IST

Updated : Apr 5, 2019, 6:22 PM IST

मात्र, जनता यावेळी संघ विचारवादी आणि जातीवादी विचारांवर चालणाऱ्या भाजपला घरी बसवेलं, असा विश्वास मायवतींनी व्यक्त केला. आमची सत्ता आली तर आतंकवाद आणि जातीयवादी नीती नष्ट करू, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

मायावती

नागपूर - भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकाच माळेच मणी आहेत. दोघेही उद्योगपतींच्या बळावर निवडणूक लढवून सत्ता मिळवतात. सत्ता आल्यावर भ्रष्टाचार करतात. काँग्रेसनं बोफर्स खरेदीत घोटाळा केला होता, आता भाजपनं राफेल खरेदीत भ्रष्टाचार केला असल्याची टीका आज बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली.

मात्र, जनता यावेळी संघ विचारवादी आणि जातीवादी विचारांवर चालणाऱ्या भाजपला घरी बसवेलं, असा विश्वास मायवतींनी व्यक्त केला. आमची सत्ता आली तर आतंकवाद आणि जातीयवादी नीती नष्ट करू, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

भाजपकडून सीबीआय आणि ईडी, या स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जात आहे. भाजपच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे सामान्य जनतेच्या आर्थिक स्रोताला मोठा धक्का लागला आहे. नोटबंदी आणि जीएसटी यामागचे प्रमुख कारण आहे. भाजप सरकार आल्यानंतर शेतकरी आत्महत्येत वाढ झाली. भाजप जुमलेबाज सरकार आहे. ते २०१४ प्रमाणे यावेळीही खोटी आश्वासन देत आहेत, असेही मायावती म्हणाल्या.

Last Updated : Apr 5, 2019, 6:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details